बोटोनी येथे पेसा वनहक्क जनजागृती अभियानांतर्गत मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर.

0

जयप्रकाश वनकर, बोटोनी:  दिनांक २६ रोज गुरुवारला ग्राम पंचायत राजीव गांधी भवन येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात वनहक्क कायदा २००६ नियम  २००८ व सुधारणा नियम २०१२ चि माहिती देण्यात आली. वनहक्क कायद्या अंतर्गत पेसा मध्ये येणाऱ्या गावाच्या ग्रामसभांचे महत्व पटून देण्यात आले होते. आदिवासी लोकांचे जीवन हे पुरातन काळापासून वनावर अवलंबून असून त्यांच्या वनहक्क व वनावरील त्यांची उपजीविका पेसा अधिकारा अंतर्गत मिळालेल्या विशेष अधिकार या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

वनहक्क कार्यक्रमासंदर्भात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. जंगलावर, वन जमिनीवर असणा-या वन हक्काना बळकटी देऊन वन संवर्धन करणे व आपला गाव समृद्ध करणे. आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.  उपस्थित ग्रामस्थांना वनहक्क व पेसा कायदा महोती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमास मारेगाव तहसीलचे नायब तहसिलदार गौरकर पं.स सदस्या सुनिता लालसरे ग्राम पंचायत सरपंचा मंजुषा मडावी,  मंडळ अधिकारी भगत, तलाठी गावंडे, बोटोनी येथील पोलीस पाटील मुकुंदराव बद्खल, ग्राम पंचायत सचिव आशा वटे उपस्थित होते. ग्रामसभेमध्ये गावातील लोकांना यशदा पुणे येथील प्रशिक्षक अशोक टेकाम यांनी वनहक्क कायदा २००६ या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.