ॲड. पल्लवी भावे यांना विधी विभागातीलआचार्य पदवी 

0 197

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूरः स्थानिक सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ येथील मानद प्राध्यापक ॲड. पल्लवी भावे यांना रा.तु.म. नागपूर विद्यापिठाने विधी विभागातील आचार्य पदवी प्रदान केली आहे. ‘‘ए क्रिटिकल स्टडी ऑफ करप्ट प्रॅक्टिसेस ॲंड इलेक्टोरल ऑफेन्सेस अंडर द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट , 1951 ॲंड नीड फॉर कॉम्प्रेहेन्सीव्ह इलेक्टोरल रिफॉर्मस् टू स्ट्रेंदन द पार्टिसिपेटरी डेमॉक्रसी ईन इंडिया’’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.

 

सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉ चे संचालक डॉ. एस. एम. राजन यांच्या मार्गदर्शनात त्यांनी पी.एच.डी.साठीचे संशोधन केले. यापूर्वी त्यांनी तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पल्लवी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे मार्गदर्शक, तसेच त्यांचे पती ॲड. नितीन भावे, मुलगा शंतनू, भाऊ पराग , आई प्रवरा, आप्त व मित्रांना देतात.

750 X 422 PODDAR
Comments
Loading...