पिसगावचे उपसरपंच मारोती गौरकार पायउतार

सरपंचासहित सर्व सदस्य उपसरपंचाविरोधात

0 206

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मागेगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या पिसगाव येथील उपसरपंच यांचे विरोधात ८ विरुद्ध १ ने ठराव पारित झाला असून सरपंचासह सात सदस्यानी उपसरपंच्या विरोधात मतदान केल्याने उपसरपंच यांना पायउतार व्हावे लागले.

पिसगाव हे ९ सदस्यीय गटग्रामपंचायत असून गेल्या अनेक दिवसांपासून येथील उपसरपंच मारोती माधव गौरकार यांच्यावर विद्यमान ग्रामपंचायत सदस्यानी कारभारात मनमाणी करणे, सरपंचाच्या निर्णयामध्ये नेहमी अडथळा निर्माण करणे, ग्रामपंचायत वस्तु खरेदी करताना ग्राम सचिवावर दबाव टाकून कमिशन मागणे, ग्रामपंचायत करिता लागलेला मु्रुम स्वत:च्या ट्रॅक्टरने टाकून प्रत्यक्ष टाकलेल्या ट्रिपापेक्षा अधिक ट्रिप दाखवणे, कोणत्याही सदस्य व सरपंचाला विश्वासात न घेता स्वत:च्या मर्जीनुसार कामे करने अशा प्रकारचे आरोप करण्यात आले होते.

उपसरपंच मारोती गौरकार यांच्या विरोधात उपस्थित सर्व पिसगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांनी हात वर करुन मारेगावचे विद्यमान तहसीलदार विजय साळवे यांचे समक्ष पिसगाव गटग्रामपंचायतीमध्ये अविश्वास ठराव पारित केला. ठराव पारित होताच उपसरपंच मारोती गौरकार ग्रामपंचायत सोडून बाहेर गेले. अविश्वास ठराव पारित करते वेळेस सचिव सुषमा गेडाम उपस्थित होत्या.

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...