वणीत पोळा उत्साहात साजरा

0

विवेक तोटेवार, वणी: वणीत पोळा उत्सव समितीद्वारा शासकीय मैदानावर पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या या कार्यक्रमात शेतकऱ्यांने मोठ्या प्रमाणात बैलांच्या जोड्या आल्या होत्या. विविध प्रकारे सजवलेल्या बैलजोड्या या कार्यक्रमाचे आकर्षण होते. तर अनेक शेतकऱ्यांने सादर केलेल्या ‘गण’ या लोकगितामुळे मैदानावरील वातावरण भक्तीमय झाले होते.

कार्यक्रमात बैल सजावट स्पर्धाही घेण्यात आली. यात अनिल काळे, लक्ष्मण तराळे या शेतकऱ्यांना उत्कृष्ट बैलजोडी सजावट केल्याबद्दल सम्मानचिन्ह देऊन गौरवन्यात आले. या कार्यक्रमात वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे, पोलीस पाटील नितीन शिरभाते, राजाभाऊ पाथ्रडकर, रविभाऊ बेलूरकर, तसेच वणीतील नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोळा उत्सव समितीचे अमर चौधरी, रवि धुळे, सुरेंद्र नालमवार, अमित उपाध्ये, आशिष पावडे, मोहित रुईकर, विकास देवतळे, राहुल खारकर, अक्षय देठे, पुनीत रुईकर, प्रमोद खूरसाने, किसन कोरडे, अक्षय देशपांडे, कमलेश त्रिवेदी, महेश लिपटे या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे आणि वणीतील नागरिकांचे पोळा उत्सव समितीने आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.