वणी पोस्टऑफिसचे ऑनलाइन व्यवहार तब्बल 12 दिवसांपासून बंद

पैशासाठी ग्राहकांच्या पोस्ट ऑफिसमध्ये रोज चकरा, ग्राहकांना नाहक त्रास

0 230

वणी: वणीतील टिळक चौकातील मेन पोस्ट ऑफिसमधील ऑनलाइन व्यवहार 2 ऑगस्टपासून बंद आहे. राऊटर बंद असल्याने गेल्या 12 दिवसांपासून पोस्टाचे सर्व ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आज व्यवहार सुरू होईल, उद्या सुरू होईल या आशेत रोज इथं ग्राहक येतात मात्र निराश होऊन परत जातात.

याबाबत यवतमाळ येथील पोस्ट ऑफिसचे एसपी यांना माहिती देण्यात आाली आहे. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल अजूनही उचलत नाहीये. ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत वणी पोस्टऑफिसचे पोस्ट मास्तर यांना विचारणा केली असता राऊटर हे कलकत्ता येथून येत असल्याने वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाइन व्यवहारासाठी जत्रा रोड पोस्ट ऑफिसचा पर्याय आहे, मात्र त्या ठिकाणी केवळ एकच कर्मचारी कार्यरत आहे.

(विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद, 600 स्पर्धकांचा सहभाग)

मेन पोस्ट ऑफिसमध्ये पेन्शन, आरडी तसंच इतर आर्थिक व्यवहार चालतात. ते व्यवहार राऊटर बंद असल्यानं पूर्णपणे बंद झाले आहेत. यामुळे ग्राहकांना स्वतः चे पैसे वेळेवर मिळत नाहीये. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही समस्या लवकरच दूर होणार असल्याचे आश्वासन वणी पोस्टातील पोस्ट मास्तरांनी दिले आहेत.

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...