बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फासी द्या

वंचित बहुजन आघाडी व माळी महासंघातर्फे निषेध मोर्चा

0
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून माळी महासंघ व वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी असलेल्या व्यक्तीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आषयाचे निवेदन तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
दि.१७ जूनच्या रात्री मारेगावात प्रभाग क्र.८ मधील ५२ वर्षीय नराधमाने घराजवळील १० वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. लाजीरवाण्या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे, त्याला नराधमाला कठोर शिक्षा व्हावी व पीडित अल्पवयीन बालिकेला न्याय मिळावा यासाठी माळी महासंघ तालुका मारेगाव व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.

निषेध मोर्चा शहराच्या जिजाऊ चौकातून मुख्यमार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे तहसिल कार्यालय येथे धडकला. तिथे पाच मुलींच्या हस्ते तहसीलदार दीपक पुंडे यांना निवेदन देण्यात आले. या निषेध मोर्चाचे नेतृत्व अॅड. राजेंद्र महाडोळे यांनी केले. मोर्चात गणेश सोनुले, भवानी मांदाडे, देवराव वाटगुरे, गजानन चंदनखेडे, राजेद्र मांदाडे, नारायण शेंडे ,नंदकिशोर निकुरे, गणेश सहारे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, माळी महासंघाचे कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.
Leave A Reply

Your email address will not be published.