पवित्र रमजानच्या काळात भारनियमन नाही – ऊर्जामंत्री बावनकुळे

0 135

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः अत्यंत पवित्र हा रमजान महिना समजला जातो. या महिन्यात रोजे म्हणजेच उपवास ठेवले जातात. रमजान काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. मुस्लिम समाजासाठी यातील काही दिवस हे अत्यंत महत्त्वाचे व सर्वाधिक पवित्र मानले जातात. या संपूर्ण महिन्यात दान, पुण्यकर्म करण्यावर विशेष भर दिला जातो.

रमजानच्या पवित्र महिन्यात वीज पुरवठा नियमित असेल असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. तांत्रिक कारणाने वीज पुरवठा खंडित झाला तर ते भारनियमन समजू नये. वीजेची कमतरता नाही त्यामुळे रमजानच्या काळात कुठेही भारनियमन करण्यात येऊ नये, असे निर्देश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

वणी शहरात रात्री-बेरात्री कधीही वीजपुरवठा खंडित होतो. थोडासा पाऊस किंवा वारा जरी आला तरी लाईन जाते. अशा वीज जाण्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होतोे. किमान या रमजान महिन्यात तरी हा त्रास होणार नाही अशी वणीकरांची अपेक्षा आहे.

750 X 422 PODDAR
Comments
Loading...