खंडणी प्रकरणात झालेल्या गुन्हाची सखोल चौकशी करुन गुन्हा मागे घ्या

ग्रामीण पत्रकार संघाची मागणी, ठाणेदारामार्फ़त एस.पी.ना निवेदन

0 593

नागेश रायपुरे, मारेगाव: झरी तालुक्यातील पाटण पोलिस स्टेशन परिसरातील अवैध व्यवसाय व पोलिस अधिकाऱ्याच्या अत्याचार विरोधात वृत प्रकाशित केल्यावरुन येथील पोलिस अधिकाऱ्याने पत्रकार सुशील ओझा यांचेविरूद्ध षडयंत्र रचून खंडणी प्रकरणात गुन्हा नोंदवला. सदर पत्रकारास अटक करुण मारहाण केल्या प्रकरणी प्रकृती खालावल्याने यवतमाळ येथे आय सी यु मध्ये ठेवण्यात आले.

या निंदनीय घटनेच्या ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावच्या वतीने जाहीर निषेध केला. सुशील ओझा यांचेवर खंडणी प्रकरणी नोंद केलेल्या गुन्हाची सखोल चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यावर करवाई करुन गुन्हा मागे घेण्याची मागणी ठानेदारामार्फ़त जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून मारेगाव ग्रामीण पत्रकार संघाने केली आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या आदेशाला हुलकावणी देत पाटण पोलीस स्टेशन हद्दीतून ठाणेदाराच्या आशीर्वादाने चालू असलली अवैध जनावरांची तस्करी, दारू तस्करी आदी अवैध व्यवसायांचा पर्दापाश पत्रकार सुशील ओझा यांनी केला. पाटण पोलीस प्रशासना विरोधात बातम्या प्रकाशित केल्यामुळे येथील पोलीस अधिकारी यांनी संगनमत करुण खंडणीच्या गुन्ह्यात षडयंत्र रचून फसविल्याचा आरोप सुशील ओझा यांनी केला.

पत्रकारावर झालेल्या अन्याय विरोधात ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने या प्रकरणाचा निषेध नोंदवून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन लावलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन ठाणेदारामार्फ़त जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना दिले. मागण्या पूर्ण न झाल्यास ऊग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

यावेळी प्रा.डॉ.माणिक ठिकरे, देवेन्द्र पोल्हे, माणिक कांबळे, ज्योतिबा पोटे, रमेश झिंगरे, अशोक कोरडे, नागेश रायपुरे, उमर शरीफ, भास्कर राऊत आदी ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी सभासदगण उपस्थित होते.

mirchi
Comments
Loading...