सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सुधाकर मत्ते यांना निरोप

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये ६ वर्षांपासून एएसआय पदावर कर्तव्य पार पडणारे सुधाकर मत्ते हे ३० जूनला सेवानिवृत्त झाले आहे. त्यानिमित्त निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस स्टेशनमध्ये मत्ते यांचा ठाणेदार धनंजय जगदाळे यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी सोयाम व डोंगरे यांचाही सत्कार करण्यात आला.

ठाण्यातील खुपिया पदावर काम करणारे संदीप सोयाम व कोर्ट मोहरर म्हणून काम करणारे उमेश डोंगरे यांना पाटण पोलीस स्टेशनकरिता कार्यमुक्त करण्यात आले. ठाण्यातील सर्वात महत्त्वाचे पद खुपियाचे असते, या जागेवर सोयाम यांनी महत्त्वाचे काम पार पाडले. यावेळी पोलीस कर्मचारी अशोक नैताम, प्रवीण ताडकोकुलवर, रमेश ताजने, मारुती टोंगे, नीरज पातूरकर, सुलभ उईके, प्रदीप कवरासे, स्वप्नील बेलखेडे, योगीता चटकी, रंजना सोयाम यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते..

Leave A Reply

Your email address will not be published.