सामाजिक बांधिलकीतून एकता निराधार संघाचा रोजगार मेळावा           

0

बहुगुणी डेस्क, वणी: जिह्यातील हजारो तरुण-तरुणीने चांगले शिक्षण घेतले आहे. त्यांच्यासाठी रोजगार उपलब्धी व्हावी या करिता एकता निराधार संघाने वसंत जिनिंग हॉल वणी येथे रोजगार मेळावा आयोजित केला होता.  मेळाव्याचे उद्घाटन प्रतीक सोनावणे यांच्या हस्ते झाले. या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्याक्ष म्हणून प्रा. रोहित वनकर  व प्रमुख पाहुणे प्रशांत भालेराव, दशरथ पाटील बोबडे, मिलिंद पाटील, आधार फौंडेशनचे अध्यक्ष राजू पडगिलवार, अशोकजी कोठारी, सरपंच रूपेश ठाकरे, मंगल तेलंग, धीरज भोयर, प्रशीक बरडे उपस्थित होते.

एकता निराधार संघाचे  जिल्हा अध्यक्ष विजय नगराळे यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने युवक युवतींसाठी दूर असलेल्या नोकऱ्या, कंपनीच्या प्रतिनिधींद्वारे मुलाखती व संवाद वणी शहरात घडवून आणला.

चेहऱ्यावर हलकासा तणाव, हातात असलेल्या प्रमाणपत्राची फाइल, फॉर्मल कापड्यांच्या वेशभूषेसह , मुलाखतीत काय प्रश्न विचारले जातील? पगार किती असणार? नोकरी कुठे मिळणार? आपली निवड होईल का? अशा अनेक प्रश्नांसह १८०० विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. मेळाव्यासाठी ऑफलाईन पद्धतीने नोंदणी केली होती. या प्रसंगी सुमारे नऊहून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी ३२४ विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड कंपनीच्या प्रतिनिधींद्वारे करण्यात आली. मेळाव्याचे संचालन बंडू कांबळे यांनी केले. आभार प्रदर्शन विजय नगराळे यांनी केले.  मेळावा यशस्वी होण्यासाठी धीरज भोयर, प्रशीक बरडे, मंगेश अवचट, अमोल कुचनकर, महेश ठावरी, चेतन वागदरकर, संदीप गोहकार, गौरव जवादे, अजय केळझरकर, अक्षय कवरासे आदींनी अथक परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.