सालेभट्टीच्या जंगलात मुख्याध्यापकाची आत्महत्या

0

मारेगाव: जि.प.शाळा पाथरी येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकांनी मारेगाव तालुक्यातील सालेभट्टी जंगल परिसरात आत्महत्या केली. सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गजानन कर्णुजी भोंगळे (५२) हे जिल्हा परिषद पाथरी येथे मुख्याध्यापक होते. मारेगाव तालुक्यातील सालेभट्टी जंगलात सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान त्याचा मृतदेह आढळला. त्यांच्या शेजारी कीटकनाशकाचा डब्बा आढळून आला. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असं बोललं जातं.

मनमिळावू स्वभाव असलेल्या मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. उत्तरीय तपासणीसाठी सदर मृतदेह मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला आहे. त्यांचे मागे पत्नी व मुलगा आहे. सदर मुख्याध्यापकांचे मारेगाव येथे शांतीनगर मध्ये वास्तव्य होते. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.