स्वराज्य संकल्प मेळाव्यासाठी ब्रिगेडचे शेकडो कार्यकर्ते औरंगाबादला रवाना

0 674

वणी: महाराष्ट्रामध्ये राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी व वर्तमान राजकीय परिस्थिती बदलून शिवराय-फुले-शाहु-आंबेडकर व खेडेकर यांना अपेक्षित लोकशाही निर्माण करण्यासाठी दि. १८ मार्च २०१८ रोजी राज्यभर स्वराज्य संकल्प अभियान मोठ्या उत्साहात राबविले गेले. त्याच अभियानाची सांगता  दि. ९ डिसेंबर २०१८ ला रोज रविवारला कडा मैदान, औरंगाबाद येथे संभाजी ब्रिगेडचा राज्यव्यापी स्वराज्य संकल्प मेळावा आयोजित केला आहे.

या मेळाव्याला शहिद हजरत टिपु सुलतान यांचे वंशज, शहजादे मन्सुर अलीशाह टिपु आपल्या मुस्लिमबांधवा व कार्यकर्तेसह संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश करणार आहेत. या मेळाव्याला वणी विधानसभाक्षेत्रातुन संभाजी ब्रिगेडचे ५०० हुन अधिक कार्यकर्ते ताडोबा एक्स्प्रेस, नंदिग्राम एक्स्प्रेस व गाड्यांनी रवाना झाले, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयभाऊ धोबे, वणी तालुकाध्यक्ष विवेक ठाकरे, मारेगाव तालुकाध्यक्ष प्रमोद लडके, झरी-जामणी तालुकाध्यक्ष देव येवले यांनी दिली.

संभाजी ब्रिगेडने गेलेल्या २६ वर्षात महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक जिवनात आपल्या अपार कार्याने एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, बेरोजगार तरुण व सर्व सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन संभाजी ब्रिगेड ने वेळो-वेळी उतरली आहे. आपल्या वैचारिकतेने व तेवढ्याच आक्रमकतेने सरकारवर अनेकदा दबाव निर्माण करुन विविध समस्या व अडचणी सोडवलेल्या आहे. लोकांच्या प्रश्नासाठी व महापुरुषांच्या सन्मार्थ संभाजी ब्रिगेडने आजवर अनेक आंदोलने केलेली आहे.

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...