वणीत संत रविदास जयंती निमित्त विविध कार्यक्रम

दोन दिवस रंगला जयंती सोहळा

0

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथे संत रविदास जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत रविदास जयंती निमित्त दोन दिवस विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वणीतील कल्याण मंडपम् नगर भवन येथे जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता.

दि. १४ फेब्रुवारी २०१९ ला सकाळी ६ वाजता शहरातील संत रविदास सभागृह ते आंबेडकर चौक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सायंकाळी सप्तखंजेरीवादक इंजिनीअर उदयपाल वणीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी दि. १५ फेब्रुवारी २०१९ ला वणी शहरातील प्रमुख मार्गाने भव्य मिरवणुक काढण्यात आली. यानंतर लगेच उद्घाटन समारंभ पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला प्रदेश अध्यक्षा डॉ. मीराताई शिंदे, उद्घाटक म्हणून वणी नगर परिषदेचे जलपूर्ती माजी सभापती संबा वाघमारे, तर मार्गदर्शक म्हणून बिहारचे राष्ट्रीय युवा व्याख्याते बृहद्रथ सूर्यवंशी व कपील श्रृंगारे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून संजय तरवरे, विश्वनाथजी टिकले, दत्ताजी वाघमारे, यशवंतजी डुबे, खोले, विनोद ढेरे हे होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड.शेखर वऱ्हाटे, तर आभार प्रदर्शन दौलत वाघमारे यांनी केले. उद्घाटनानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यात चिमुकले तसेच तरुण तरुणींनी आपली कला सादर केली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन महेश लिपटे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत वाघमारे, भारत लिपटे, योगेश सोनोने, रविंद्र धुळे, किशोर हांडे, अमोल बांगडे, किसन कोरडे, आकाश डुबे, आशिष डुबे, वैभव उपाध्ये, सुबोध बांगडे, शैलेश वाघमारे यांनी परिश्रम घेतले. संत रविदास महाराज चर्मकार सुधार मंडळ, वणी व संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.