वणीत संत रविदास महाराज जयंती सोहळा 14 व 15 ला

गुरूवारी आणि शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

0 260

बहुगुणी डेस्क, वणी: मानवतेचे प्रेरणास्थान संत रविदास महाराज यांची जयंती वणी शहरात 14 व 15 फेब्रुवारीला साजरी होत आहे. या निमित्त गुरूवारी सकाळी 6 वाजता संत रविदास सभागृह ते आंबेडकर चौक दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात येईल.

सायंकाळी इंजि. उदयपाल वणीकर यांचे प्रबोधन होईल. शुक्रवारी 15 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजता संत रविदासांना अभिवादन करण्यात येईल. सकाळी 9 वाजता शहरातील मुख्य मार्गांवरून मिरवणूक निघेल. सकाळी 11 वाजता जयंती उत्सवाचे उद्घाटन माजी जलपूर्ती सभापती संबा वाघमारे यांच्या हस्ते होईल.

या सोहळ्यााच्या अध्यक्षस्थानी महिला प्रदेश राष्ट्रीय चर्मकार महासंघ, अध्यक्ष सावित्री महिला आधार संस्था, ज्येष्ठ पत्रकार डॉ. मीरा शिंदे राहतील. पटना, बिहार येथील युवा व्याख्याते बृहद्रथ सूर्यवंशी यावेळी मार्गदर्शन करतील.

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून कपिल श्रृंगारे, संजय तरवरे, विश्वनाथ टिकले, दत्ता वाघमारे राहतील असे आयोजन समितीचे अध्यक्ष विनोद ढेरे यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

mirchi
Comments
Loading...