सावंगी येथे वाघाचा गुरांवर हल्ला

एक गोऱ्हा ठार

0 289

शिंदोला, (विलास ताजने): वणी तालुक्यातील सावंगी (लहान) येथील एका शेतातील मांडवात बांधलेल्या गुरांवर वाघाने गुरुवारच्या पहाटे हल्ला केला. या घटनेत एक गोऱ्हा ठार झाला. सदर घटनेमुळे परिसरातील शेतकरी धास्तावले आहे.

सावंगी येथील शेतकरी बापूराव धानकी यांच्या शिवणी शिवारालगत असलेल्या शेतात पाच गुरे बांधलेली होती. रात्री अचानक वाघाचा हल्ला होताच कुत्रा भुंकू लागला. गुरेही हंबरली. नेमक काय झालं, हे पाहण्यासाठी शेतात पिकांच्या रखवालीसाठी जागलीला असलेले बापूराव धानकी गुरांजवळ गेले. त्यावेळी गोऱ्हा रक्तबंबाळ अवस्थेत तडफडत होता. गोऱ्हयाच्या मानेवर आणि घांटीवर घाव होता. बाजूला बॅटरीद्वारे प्रकाश टाकताच वाघ शेतालगतच्या नाल्याच्या दिशेला जाताना त्यांना दिसल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.

सदर घटनेची माहिती गुरुवारच्या सकाळी वनाधिकारी एम. आर. वालकोंडावार यांना देण्यात आली. वनाधिकारी, वनपाल यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. सदर घटनेत धानकी यांचे दहा हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वणी वनविभागाकडे नुकसान भरपाईच्या मागणीसाठी निवेदन दिले आहे.

You might also like More from author

Comments

Loading...