राजूर येथे सावित्रीमाई फुले जयंती साजरी

जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0 339

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर कॉ. येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात या निमित्त विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजूर कॉलरी येथील राष्ट्रीय विद्यालयाच्या पटांगणात हा कार्यक्रम घेण्यात आला. महिला समारोह समिती व बहुजन स्टुडंट्स फेडरेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 19 वर्षांपासून राजूर कॉलरीमध्ये सावित्री उत्सव साजरा केला जात आहे.

दि ३ जानेला सकाळी १० वा अभिवादन मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक राष्ट्रीय विद्यालय ते सावित्रीबाई चौक काढण्यात आली. या मिरवणुकीत शालेय विद्यार्थी, महिला, युवक व गावकऱ्यांनी सहभाग घेतला. स्थानिक युवतींनी हातात मशाली घेऊन सावित्रीबाईंनी केलेली वेशभूषा हे या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण ठरलं. सकाळी १०:३० वाजता या उत्सवाचे रितसर उद्घाटन करण्यात आले. यवतमाळ येथील सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त डॉ. सारिका शहा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भांदेवाडा ग्रापंचे सरपंच दर्शना मानवटकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई आत्राम व अभिजात मराठी शिक्षण सा प चे स्वप्ना पावडे व विशेष अतिथी म्हणून रामदेवबाबा मूकबधीर विद्यालयाचे सरोजताई भंडारी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून वसुंधरा गजभीये, वृषाली खानझोडे, अरुणा खोब्रागडे, दिशा पाटील, जुमनाके, सिडाम, आवारी हा महिला होत्या.

उद्घाटन समारंभात नुकतेच स्पर्धा परीक्षा उतिर्ण करून यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रिया सुनील तेलतुंबडे यांची मुंबई पोलीस विभागात निवड झाल्याबद्दल तर राकेश भीमराव जंगले यांची ईस्टर्न कोल फिल्ड मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

याच कार्यक्रमात सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. ही स्पर्धा २३ डिसें रोजी घेण्यात आली होती. यात प्रथम बक्षीस अक्षय लक्ष्मण टेकाम, द्वितीय योगेश मनोहर राठोड, तृतीय खुशाल रमेश पवार व चतुर्थ बक्षीस प्रज्योत गंगाराम काळेला देण्यात आले. तर मराठी हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम पुरस्कार निकुंज रणवीर आत्राम, द्वितीय अक्षय लक्ष्मण टेकाम व तृतीय यश अरुण फुलझेले यांनी पटकावले. या स्पर्धेंचे परीक्षा प्रमुख महेश लिपटे होते.

दि ४ जाने ला दु १२ वा आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, चर्मरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ व हृदयरोग-मधुमेह तज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेऊन तपासणी केली. यावेळी रुग्णांना मोफत औषधींचे वितरण करण्यात आले. दुपारी 4 वाजता गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम स्थानी तन्वी राहुल कवाडे, द्वितीय तनुश्री रतन राजगडकर तर तृतीय स्थानी ख़ुशी चंद्रमनी खैरे राहिली. सायंकाळी ७ वा औरंगाबाद येथील प्रसिद्ध संमोहन तज्ञ एस के नांदेडकर यांच्या संमोहनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमातून अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यात आली.

उद्घाटनीय कार्यक्रमाचे सूत्र संचालन रक्षा वानखेडे,अश्विनी जंगले यांनी केले तर प्रास्ताविक सुनीता कुंभारे यांनी व आभार प्रतिमा दुधे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश लिपटे, विक्की जंगले, अंकुश पेटकर, निता निममसटकर, अर्चना कडूकर, ज्योती वेले, प्रणाली पुनवटकर, अल्का भोंगाडे, सुजाता पुनवटकर, शोभाताई उमरे, सोनूताई भालेराव, सतीश भडके,प्रणिल कांबळे,स्वप्नील कवाडे, आकाश अंबागडे, प्रांजल खैरे, त्रिशांत साव, तुषार साव, तुशांत साव, राकेश जंगले व सुरज पुणेकर, रोहीत जांगडे, यांनी परीश्रम घेतले.

mirchi
Comments
Loading...