राजूर कॉलरीमध्ये सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाला सुरूवात

कार्यक्रमात समाजकंटकाचे विरजन

0

राजूर कॉ.: राजूर कॉलरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाला सुरूवात झाली आहे. सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मंगळवारपासून या महोत्सवाला सुरूवात झाली. मंगळवारी आणि बुधवारी होणा-या या महोत्सवात विविध स्पर्धा आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. महिला समारोह समिती व बहुजन स्डुडंट्स फेडरेशन, राजूर कॉ. यांच्या संयुक्त विद्ममाने हा महोत्सव घेण्यात येत आहे.

या महोत्सवाला मंगळवारी दिनांक 2 ला सकाळी 10 वाजता शो-ड्रिल स्पर्धेने सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजता नृत्य स्पर्धा घेण्यात आली. तर बुधवारी सकाळी ९ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीनंतर लगेच उद्घाटन समारंभाला सुरूवात होईल. या कार्यक्रमातच महोत्सवातील झालेल्या स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात येणार.

कार्यक्रमा दरम्यान आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजीत केले आहे. तर संध्याकाळी साक्षी अतकरे (बालकिर्तनकार,भद्रावती) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राजूर नगरीत आयोजित अशा या भव्यदिव्य कार्यक्रमाचा जनतेनी लाभ घ्यावा असे समितीच्या वतीने आव्हान केले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन भुंपकाळे (सभापती, जि. प.यवतमाळ),अध्यक्षा वृषाली खानझोडे (माजी उपसभापती, पं.स.वणी), प्रमूख मार्गदर्शिका पुष्पाताई आत्राम (सामाजिक कार्यकर्त्या, वणी), नजिना खान (सामाजिक कार्यकर्त्या, नागपूर), तर विशेष उपस्थीती म्हणून अरूणा खंडाळकर (सभापती, जि.प. यवतमाळ), लिशा विधाते (सभापती,पं.स.वणी), भंडारी, दांडेकर असणार आहे. तसेच प्रमूख पाहूणे म्हणून प्रणीता मो. असलम (सरपंच,ग्रा.पं.राजूर), दर्शना मानवटकर (सरपंच,ग्रा.पं.भांदेवाडा), बिना सिंग आणि इतर तसेच राजूर कॉ, ईजारा, बोदाड, भांदेवाडा गावकरी यांच्या उपस्थितीत हा भव्यदिव्य कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमात समाजकंटकाचे विरजन
मंगळवारी संध्याकाळी नृत्य स्पर्धेदरम्यान काही समाजकंटकानी गोंधळ घातल्याने कार्यक्रम मध्येच थांबवण्यात आला. राजूर कॉलरीमध्ये पहिल्यांदाच सावित्रीबाई फुले जयंती अशी भव्यदिव्य स्परुपात साजरी करण्यात येत होते. त्यासाठी गावातील कार्यकर्ते परिश्रम घेत होते. पण संध्याकाळी शेवटचे काही नृत्य शिल्लक असताना काही समाजकंटकांनी कार्यक्रमादरम्यान गोंधळ घालण्यास सुरूवात केली. जयंतीमहोत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये या करीता आयोजकांनी कार्यक्रम मध्येच बंद करण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आयोजकांनी आधीच पोलिसांनी सुरक्षा मदत मागितली होती. मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं. असा आरोप आयोजन समितीने केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.