चिखलगाव जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समिती गठीत

अध्यक्षपदी बंडू देवाळकर तर उपाध्यक्षपदी सविता पहापळे

0

वणी: शहरालगत असलेल्या वरिष्ठ प्राथमिक शाळा चिखलगाव येथे सोमवारला शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्याध्यापक मनोहर दरेकर यांनी शासनाच्या शासन निर्णयाची उपस्थित पालकांना माहिती देत सभेला सुरुवात केली. सभेला ९५ पालक उपस्थित होते.

शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासाठी सुरुवातीला पालकातून ९सदस्यांची निवड करण्यात आली यात बंडू देवाळकर,सविता मारोती पहापळे, नंदा संजय कावळे,नंदा गोपाल कुतरमारे, दिलीप रतन बहादुरे, संगिता प्रवीण झाडे,अरविंद केशव ढुमणे, संतोष रामाजी पेंदोर,रिता अंकुश टोंगे आदींची निवड करण्यात आली. यातूनच शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली. यात अध्यक्षपदी बंडू ज्ञानेश्वर देवाळकर तर उपाध्यक्षपदी सविता मारोती पहापळे यांची निवड करण्यात आली. तर शिक्षण तज्ज्ञ म्हणून लटारी खापणे यांची निवड झाली.

ग्रामपंचायत प्रतिनिधीसाठी मुख्याध्यापक ग्रामपंचायतला पत्र पाठवून त्यांच्याकडून आलेल्या ठरावानुसार नेमणूक करण्यात येणार आहे. या शाळा व्यवस्थापन समिती ची निवड पुढील दोन वर्षासाठी करण्यात आली आहे. सदर समितीचे सचिव मुख्याध्यापक मनोहर दरेकर आहेत. यावेळी पालक व शिक्षकवृंद उपस्थित होते. नवीन शाळा व्यवस्थापन समिती च्या सदस्यांना सरपंच सुनील कातकडे उपसरपंच अमोल रांगणकार यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.