शाळा क्र 7 मध्ये 8 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप

शिक्षक विजय चव्हाण यांच्या मुलाचा पालिकेच्या शाळेत प्रवेश

0 312

देवेंद्र खरवडे (सांस्कृतिक प्रतिनिधी) वणी: दिनांक 13 एप्रिल सोमवारला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र 7 मध्ये 8 वीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. तसेच इयत्ता १ली मध्ये ५ विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचे स्वागत नगर पालिकेच्या शिक्षण सभापती आरती वांढरे व शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे यांचे हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमात शाळेच्या स्नेहसंम्मेलनात विविध कला व क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. तसेच संगीता झाडे यांनी शाळेला प्रमुख अतिथींच्या हस्ते पंखा भेट दिला. नगर पालिकेच्या शाळेचे शिक्षकच त्यांच्या मुलांना दुस-या शाळेत शिकवण्यासाठी पाठवतात. त्यामुळे पालिकेच्या शाळेतून देण्याय येणा-या दर्जावर कायम प्रश्नचिन्ह उपस्थित केले जायचे. मात्र शाळा क्र 7 शाळेचे शिक्षक विजय चव्हाण यांनी स्वत:च्या मुलाचा प्रवेश पहिली मध्ये करत इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

या कार्यक्रमात प्रेरणा कुळसंगे, राणी चाफले, किर्ती मिलमिले इत्यादी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करुन शाळेविषयी व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी प्रास्ताविकाद्वारे चंदू परेकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पूढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. वंदना परसावार, विजय चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सिंधूताई गोवारदीपे यांनी सखोल मार्गदर्शन केले.

आरती वांढरे यांनी गुरुशिष्यांचे अतूट नाते पाहून समाधान वाटल्याचे सांगितले. तर गिरीधर चवरे यांनी शाळेची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष माधुरी राखुंडे, संगीता झाडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका तिलोत्तमा अंभोरे इत्यादी पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन इयत्ता 7 वीची विद्यार्थीनी कु.आकांक्षा देठे हिने केले तर आभार कु. तपस्या सारवे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष दुमोरे, कल्पना मुंजेकर, वंदना परसावार, चंदू परेकार, शुभांगी वैद्य, मंगला पेंदोर, विजय चव्हाण, वसंता शेंडे यांनी परिश्रम घेतले.

25 मार्च अंतिम तारीख

Comments
Loading...