आज वणीत महिलांसाठी कायदा व लघुउद्योग मार्गदर्शन शिबिर

तज्ज्ञ प्रशिक्षक देणार कायदा व स्वरोजगाराचे धडे

0 335

विवेक तोटेवार, वणी: जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिला सक्षमीकरणासीठी वणी मध्ये कायदेविषयक सल्ला, लायटिंग प्रशिक्षण व लघु उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण रविवारी 10 मार्चला  दुपारी एक ते चार या कालावधीत घेण्यात येणार आहे. वणीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय बस स्टँड जवळ येथे हे प्रक्षिक्षण आयोजित करण्यात आले आहे. चंद्रपूर, यवतमाळ इत्यादी ठिकाणावरून येऊन तज्ज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. 

या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. प्रीती लोढा असून कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा आहे. कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून ऍड विजयाताई मांडवकर, भावना नवाते, प्रज्ञा नरवाडे व चंद्रपूर येथील लघुउद्योग विभागातील राजेश डोंगरे करणार आहे.

आज महिलांनी सक्षम होणे गरजेचे आहे. केवळ स्वरक्षणाचे धडे घेणे म्हणजेच स्त्रियांनी सक्षम होणे असे नाही, तर स्त्रियांनी लघुउद्योग, स्वयंरोजगार इत्यादींच्या माध्यमाने आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे ही काळाची गरज आहे. जेव्हा महिला स्वतःच्या पायावर उभ्या होईल तेव्हाच महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण झाले असे म्हणता येईल. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महिलांना कायदेविषयक माहिती मिळावी तसेच लघुउद्योग व स्वयंरोजगार या बद्दलची माहिती मिळावी यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी दिली.

या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्ष संगीता खटोड, विजयाताई आगबत्तलवार, हेमलता लांडगे, अर्चना मनोहरे, ज्योती मिश्रा, पूजा गडवाल, मंदा तामगाडगे, सुषमा मोडक उज्वला दानवे, रंजना एकरे इत्यादींनी केले आहे.

mirchi
Comments
Loading...