आज वणीत विदर्भ बंदचे आवाहन

बंदला सहकार्य करण्याचे आवाहन

0

गिरीश कुबडे, वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती वणी, मारेगाव व झरी द्वारा स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी 11 डिसेंबर रोजी विदर्भ बंदचे आवाहन करण्यात आलें आहे.

गेल्या 100 वर्षापेक्षा जुनी लढाई आणि मागणी असलेल्या विदर्भासाठी आता आरपारची लढाई करण्याची वेळ आली आहे. आज पर्यतच्या सर्व सत्ताधारऱ्यांनी आपल्या जाहिरनाम्यात विदर्भाला स्वतंत्र करू असे अभिवचन दिले असताना सुद्धा ते मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष करीत असल्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आजपर्यत जो विदर्भावर अन्याय केलेला आहे.

अन्यायाचे निवारण करण्यासाठी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समिती व विविध राजकीय सामाजिक संघटनांचे पधाधिकारी प्रा.पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, मंगलबाबू चिंडालिया, संजय देरकर, दिलीप परचाके, अनिल घाटे, गीत घोष, मंगल तेलंग, देवराव पाटील धांडे, दिलीप भोयर, प्रवीण खानझोडे, शालिनी रासेकर, संध्या रामगिरवार, विजयाताई आगबत्तलवार, आकाश सूर, केतन ठाकरे, राहुल खारकर यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.