शहाबुद्दीन अजानी यांना MDRT बहुमान

सलग दहा वर्ष किताब पटकावून विक्रम

0 723

बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय जीवन विमा निगम, वणी शाखेचे विमा अभिकर्ता शहाबुद्दीन अजानी यांनी MDRT हा बहुमान यावर्षीही मिळवला आहे. त्यांना सलग दहाव्यांदा एमडीआरटी मेंबरशिप प्राप्त झाली आहे. हा वणी शाखेत एक नवीन विक्रम आहे. लवकरच ते अमेरिका येथे संमेलनासाठी जाणार आहे.

आवश्यक व्यवसाय केलेल्या विमा अभिकर्त्याला MDRT (मिलियन डॉलर राउंड टेबल) चा बहुमान मिळतो. यात जगभरातील विमा एजेंट्स या सेमिनारला येतात. जगातील विविध देशातील मोठ्या शहरात हे सेमिनार होतात. या वर्षी पात्र झालेल्या एजेंट्सचे सेमिनार अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील मियामी शहरात 9 जून ते 12 जून 2019 दरम्यान आहे.

विमा क्षेत्रातील जागतिक स्तरावरील अमेरिकेच्या प्रतिष्ठित मिलीयन डॅालर राऊंड टेबलसाठी शहाबुद्दीन अजानी यांना आमंत्रण मिळाले आहे. मागील दहा वर्षांपासून सदर एमडीआरटी मेंबरशिप प्राप्त करणारे वणी शाखेचे शहाबुद्दीन अजानी हे प्रथम व एकमात्र अभिकर्ता आहे. तसेच कॅनडा येथील आंतरराष्ट्रीय गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित राहणारे अमरावती विभागातील ते एकमेव अभिकर्ता आहे.

त्यांच्या या गौरवमय कार्याबद्दल वणी शाखेव्दारे त्यांचा सन्मान करण्यात आला. शाखाधिकारी रवींद्र कमाने, साहाय्यक शाखाधिकारी राऊत, विकास अधिकारी विटाळकर आदींनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्यांच्या या यशाबद्दल परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

mirchi
Comments
Loading...