शिंदोल्यातील लिटल रोझ कॉन्व्हेंटमध्ये स्नेहसंमेलन

विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल

0

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील शिंदोला येथील लिटल रोझ कॉन्व्हेंटमध्ये दि. ३०,३१ जानेवारीला स्नेहसंमेलन पार पडले. या दरम्यान विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थासचिव रवींद्र पांगुळ होते. सरपंच विठ्ठल बोन्डे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्दघाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाध्यक्ष अमोल हेपट, मनीषा हेपट, उपसरपंच किशोर किनाके, प्रा.रणजित गोरे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष कुंडेकर, मनीषा पिदूरकर, भास्कर दानव, किशोर चवणे उपस्थित होते.

तर कळमनाचे सरपंच शांताराम राजूरकर, येनकचे तात्याजी बोन्डे, शेवाळाचे रामनाथ भेंडाळे, मुख्याध्यापिका मंदा पाचभाई यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. याप्रसंगी कबड्डी, लंगडी, खोखो या सांघिक खेळासह मनोरंजक स्पर्धा घेण्यात आल्या. चिमुकल्यांनी एकल नृत्य, समूह नृत्य, लघु नाटिका आदी कार्यक्रम सादर केले. विजेत्यांसह सहभागी चिमुकल्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

संचालन दिलीप अवधाने यांनी केले. योगिता ढवसने आभार मानले. यशस्वीतेसाठी  शिक्षक सूरज बारा, दीक्षा बोन्डे, वर्षा टोंगे, प्रांजली चिडे, सपना थोरात, अनिल चिडे, कैलास ढवस, मनोज उलमाले, प्रदीप उईके यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.