शिरपूर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट

तलावातील रोपे काढण्याचा केविलवाणा प्रयत्न

0 170

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीच्या कारनाम्याचे वृत्त वणीबहुगुणी न्यूज पोर्टलवर झळकतात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. झालेल्या प्रकाराची चौकशी होईल या भीतीने रोपे तलावातून बाहेर काढण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे.

सदर ग्रामपंचायतीला वृक्ष लागवडीसाठी एक हजार २०० रोप मिळाली होती. परंतु सर्व रोपांची लागवड न केल्यामुळे काही रोपे सुकली होती. सुकलेली रोपे गेली चार महिने ग्रामपंचायतीच्या खोलीत दडवून ठेवली. परंतु या प्रकाराची कुणालाही कुणकुण लागू नये म्हणून मंगळवारी शिल्लक रोपे पहाटेच्या वेळी वाहनाद्वारे गावलगतच्या तलावात फेकली.

पाण्यात बुडालेल्या काही रोपांचे प्लास्टिक बाहेर काढून गोळा केली. परंतु खोल पाण्यात बुडालेली रोपे अजूनही तलावात पडलेली दिसून येत आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकरणात बेजबाबदारपणे वागून शासकीय योजनेचा बट्याबोळ करणाऱ्यावर काय कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...