जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी घेतला स्नेहभोजनाचा आस्वाद

0

वणी (विवेक तोटेवार): खर तर जिकडेतिकडे जेवणावळी सुरू झाल्या आहेत. कोणी मंदिरात तर कोणी घरी जेवायला बोलावितात मात्र वणी बहुगुणी न्यूज चे निवासी संपादक रवि ढुमणे यांनी ग्रामीण भागात शिकत असलेल्या मुलांना स्नेहभोजन देऊन त्यांच्या आनंदात आनंद द्विगुणित केला आहे.

सध्या लग्न, बारसे, साक्षगंध व मंदिरातील पूजा यात जेवणाच्या मेजवाणीचे पीक चांगलेच बहरले आहेत या मंगल कार्यक्रमात सहभागी होणारी मंडळी साधारणतः तृप्त असतातच आणि आपले स्नेही म्हणून तृप्त असलेल्या मान्यवरांना तिथे पाचारण करतो. परंतु या परंपरेला बगल देत वणी बहुगुणी न्यूजचे निवासी संपादक रवि ढुमणे यांनी चिमुकल्यांना सोबत घेऊन त्यांना स्नेहभोजन दिले.  अंगणवाडीतील लहान चिमुकले,व वर्ग 1 ते 5 च्या विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला.  बालकांनी मनमुराद या स्नेहभोजनाचा आंनद लुटला. या उपक्रमाने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यात शाळा व्यवस्थापन समिती सभापती, सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षिका  व रवि ढुमणे यांचे सहकारी रवि कोमलवार, राजू भट यांनी सहभाग घेतला आणि सहकार्य केले.

दरवर्षी ग्रामीण भागातील शाळांमध्ये नवनवीन उपक्रम राबवून ग्रामीण भागातील शाळांना मदत आणि पटसंख्या तुटणार नाही यासाठी ते प्रयत्नात असतात.  मग शाळा डिजिटल करणे असो की शाळेत काही साहित्य लागले तर रवि ढुमणे हे शाळांना आवर्जून मदत करतात.  मुळातच ग्रामीण भागातील विद्यार्थी घडविण्यासाठीच त्यांचे प्रयत्न आहेत.  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विकास साधण्यासाठी त्यांची ही खटाटोप आहे.  यावर बोलतांना त्यांनी सरळ आणि सोप्या पद्धतीने सांगितले की, गावात भागवत सप्ताह, काला, मंदिरे उभारण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर वर्गणी गोळा करतात.पण ज्ञानदान करणार एकमेव मंदिर असलेल्या शाळांना मदत करायला लोक शिक्षकाकडे बोट दाखवतात.  ज्या मंदिरातून पिढ्यानपिढ्या घडत आहेत त्याकडे दुर्लक्ष करतात.  प्रत्येक गावातील लोकांनी यावर विचार करुन आपल्या गावातील विद्येच मंदिर असलेल्या शाळांना हातभार लावला तर आपली व आपल्या गावाची भविष्यात प्रगती होईल. इतर ठिकाणी खर्च केला तर त्याचा फायदा होणार नाही . मात्र शाळेत खर्ची घातलेला पैसा कित्येक अधिकारी व चांगले माणसे घडवतील.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवायचे असेल तर प्रथम गावातील शाळांकडे लक्ष देऊन त्या शाळेला मदत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न व्हायला हवे.  जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्याना स्नेहभोजन देऊन रवि ढुमणे यांनी एक नवीन सुरुवात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.