शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रहार मध्ये दाखल

जिल्हा प्रमुखांच्या कुरघोडीला कंटाळून केला अखेरचा जय महाराष्ट्र

0 576

वणी (रवि ढुमणे): पुढील वर्षात लोकसभा, विधानसभा निवडणुका होणार आहे.  त्यानिमित्ताने विविध पक्षात खलबत्ते सुरू झाले आहेत. वणी तालुक्यातील शिवसेनेचे। माजी तालुकाप्रमुख, तथा पंचायत समितीचे माजी सभापती सुधाकर गोरे यांनी जिल्हा प्रमुखांच्या कुरघोडीला कंटाळून शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश घेतला आहे.

तालुक्यातील पूर्वीचा कायर-वेळाबाई जिल्हा परिषद मतदार संघ गट म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला होता.  याच गटातील कुंड्रा या गावातील सुधाकर गोरे हे पूर्वीपासून कट्टर शिवसैनिक होते. जिल्हा परिषद सदस्य, तालुकाप्रमुख, व पंचायत समितीचे सभापती पद असे विविध पदे त्यांनी भूषविलेले होते.  गेल्या काही वर्षांपासून त्यांना जिल्हा प्रमुखांनी कोणत्याही महत्वाच्या बाबतीत विश्वासात न घेता त्यांना डावलून कुरघोडी केली असल्याची खंत खुद्द सुधाकर गोरे यांनी वणी बहुगुणीशी बोलतांना व्यक्त केली. पक्षाचे प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याने त्यांच्या मनात खदखद सुरूच होती.

अखेर शिवसेनेच्या सुधाकर गोरे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अमरावती जिल्ह्यात वणीचे माजी नगरसेवक अकिल सातोकर, सिद्दीक रंगरेज यांच्या नेतृत्वाखाली सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत प्रहार मध्ये प्रवेश घेतला आहे.  या प्रवेशामुळे आता राजकीय खलबत्ते सुरू होण्याची चिन्हे दिसायला लागली आहे.

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...