तहसिलदारांच्या अफलातून कारभाराने पोलीस पाटील, कोतवाल त्रस्त

पोलीस पाटलांनी घेतली तहसिलदारांची भेट

0

रवि ढुमणे, वणी: फवारणीतून विषबाधा झालेल्या प्रकरणाचे खापर स्थानिक कोतवाल आणि पोलीस पाटलांवर फोडण्यात आले आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कोतवाल हे तलाठ्याला सहाय्यक असते. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तहसिलदारांच्या हा विचित्र न्यायामुळे पोलीस पाटील आणि कोतवाल त्रस्त झाले आहेत. दरम्यान सोमवारी त्यांनी मारेगावचे तहसिलदार विजय साळवे यांची भेट घेतली असता. त्यांनी तलाठ्यांकडून अहवाल मागवला असता त्यांना तलाठ्यांकडून अहवाल मागवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.

सोमवारी पोलीस पाटील असोशिएनच्या वतीनं तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. यात त्यांनी विषबाधेसंबंधी प्रशासनाला आधीच माहिती दिली असल्याच सांगितलं. 14 ऑक्टोबरला तहसिलदारांनी कोतवाल आणि पोलीस पाटलांची एक संयुक्त मिटिंग घेतली. जर तहसिलदारांनी या प्रकरणी ही मिटिंग इतक्या उशीरा न घेता आधीच घेतली असती. तर अनेकांना झालेली विषबाधा टाळता आली असल्याचं म्हटलंय.

फवारणीतून विषबाधा झाल्याचे प्रकऱण समोर येताच प्रशासनाला जाग आली, या प्रकरणाची माहिती गावस्तरावर असलेल्या पोलीस पाटील आणि कोतवालांनी दिली नसल्याने त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. वास्तविक पाहता शेतक-यांना फवारणीतून विषबाधा झाली आहे याची माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रशासनाला कळली होती. प्रशासनाला विषबाधेची माहिती असताना स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसिलदार, तहसिलदार यांनी घटनास्थळी भेट देणे गरजेचं होतं. इतकेच नव्हे तर विषबाधा झालेल्या शेतक-यांच्या घरी अथवा रुग्णालयात जावून चौकषी करणे आणि अहवाल तयार करणे हे कामे प्रशासकिय यंत्रणेचे होते.

गावात कोतवाल हा महसूल विभागाच्या कामासाठी तलाठ्याला सहायक असतो. तर पोलीस पाटील हा कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे काम करतो. हे दोघे ही मानधन तत्वावर काम करतात. त्यांना अहवाल सादर करण्याचे कोणतेही अधिकार नसताना, मारेगावचे तहसिलदार विजय साळवे यांनी विषबाधा प्रकरणाचे खापर कोतवाल आणि पोलीस पाटीलांवर फोडलं आहे.

कोतवाल व पाटील यांच्या नियुक्त्या उपविभागीय अधिकारी यांचे स्तरावर होतात. त्यांची नियुक्ती उपविभागीय अधिकारीच करतात मग तहसिलदारांनी थेट कोतवाल पाटील यांना निलंबित कसे केले असा प्रश्न कोतवाल उपस्थित करीत आहे. एकूणच मारेगाव तहिसलदारांच्या मनमानी कारभारामुळे कोतवाल आणि पोलीस पाटलांनी एल्गार पुकारला आहे. सध्या ते वरीष्ठ अधिका-यांची भेट घेत असून या प्रकरणात खुद्द जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निलंबित कोतवाल आणि पोलीस पाटलांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.