प्रवासी भरण्याच्या वादातून ऑटो चालकाला मारहाण

0

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस स्टेशन पासून जवळच असलेल्या वरोरा मार्गावर ऑटोत प्रवासी भरण्याच्या वादातून आटो चालकाला एकाने हातातील कड्याने वार करून जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

शहरातील वरोरा मार्गावर येणाऱ्या एकता नगर जवळ प्रवासी आटोच्या रांगा लागतात. वरोरा मार्गाने जाणारे तसेच कोरपना कडे जाणारे प्रवासी वाहने क्रमाक्रमाने प्रवासी भरतात. राजेश दिलीप वानखेडे हा आटोचालक प्रवासी आटोत भरून निघण्याच्या तयारीत असताना एकता नगर भागातील जोसेफ डावले याने राजेशच्या आटोतील प्रवासी उतरवून स्वतःच्या आटोत भरले.

यात राजेशने त्याला हटकले असता जोसेफ ने हातात असलेल्या धारदार कड्याने राजेशच्या डोक्यावर वार करून जखमी केल्याची तक्रार राजेशने पोलिसात दिली त्यावरून जोसेफ विरुद्ध भा दं वि 324 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.