तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन

फुटबॉल सामन्यात वणीतील तीन शाळा अव्वल 

0 244

वणी: येथील शासकीय मैदानावर शनिवारी शालेय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालं. उद्घाटनाच्या दिवशी तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला. यात वणीतील तीन शाळा अव्वल ठरल्या आहेत. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्याआधी तालुका स्तरीय फुटबॉल सामन्याचे आयोजन येथील शासकीय मैदानावर करण्यात आले होते. प्रसंगी तालुक्यातील 12 शाळांनी सहभाग नोंदवला होता.

 

असा आहे कार्यक्रम: 

26 ऑगस्टला योगासने, बुद्धिबळ, बॅटमिटन, 30 व 31 ऑगस्टला कबड्डी, 6 व 7 सप्टेंबरला खोखो, 11 व 12 सप्टेंबरला व्हॉलीबॉल,15 सप्टेंबरला मैदानी खेळ,18 सप्टेंबरला क्रिकेटआणि 8 ऑक्टोबरला कुस्तीच्या स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सर्व शाळांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दरम्यान शनिवारी फुटबॉलचे सामने झाले. शाळेतील शिक्षकांनी आपापल्या शाळेतील 14 वर्षाच्या आतील,17 वर्षाच्या आतील व 19 वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला होता. यात 14 वर्षाच्या आतील गटात लायन्स इंग्लिश मिडीयम स्कुल वणी, 17 वर्षाच्या आतील गटात डीएव्ही स्कुल सुंदरनगर, 19 वर्षाच्या आतील गटात स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कुल वणी यांनी विजेतेपद मिळविले.

(हे पण वाचा: अट्टल घरफोड्या मोबाईल अडकला पोलिसांच्या जाळ्यात) 

तालुकास्तरावर पार पडलेल्या फुटबॉल क्रीडा स्पर्धेसाठी संयोजक प्रवीण समर्थ नितीन कन्नमवार, नीरज टेकाम, नितीन घाटे, प्रशांत गोडे संतोष बेलेकार, प्रवीण बेलेकर, प्रवीण समर्थ, रणजीत पचारे आदींनी परिश्रम घेतले. हे सामने पाहण्यासाठी वणीकरांनी मोठी गर्दी केली होती.

.

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...