नांगरणी करताना ट्रॅक्टर पलटी, एक ठार

0 666

ज्योतिबा पोटे, मारेगाव: शेतात नांगरणी करित असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने एक जण ठार झाला. बुधवारी पाच वाजताच्या सुमारात करणवाडी शिवारात ही घटना घडली.

प्राप्त माहिती करणवाडी येथील ताजने यांच्या मालकीचा ट्रॅक्टर आहे. ते ट्रॅक्टर दिनेश लक्ष्मण सुरपाम (19) मु.खडकी हा चालवायचा. आज शेतात नांगरणी करीत होता. नांगरणी शेवटच्या टप्यात होती. दिवसभरातील नांगरणी संपवून दिनेश संध्याकाळी ट्रॅक्टर गावाकडे परत नेत होता. मात्र शेता लगत असलेल्या नालीत ट्रॅक्टर पलटी झाले. यात दिनेश गंभीर जखमी झाला.

त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

NBSA
Comments
Loading...