साई मंदिर जवळ भीषण अपघात

भरधाव ट्रॅक्टरची ऑटोला धडक, नागरिकांचा चालकाला चोप

0 3,434

बहुगुणी डेस्क, वणी: आज दुपारी तीन वाजताच्या दरम्यान यवतमाळ रोडवरील साई मंदिर जवळ भांदेवाडा येथून येत असलेल्या प्रवासी ऑटोला विरुद्ध दिशेने जाणा-या भरधाव ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हाणी झाली नाही. परंतु अपघाताची भीषणता एवढी होती की दोन्ही वाहनांच्या धडकेचा मोठा आवाज शेकडो मीटरपर्यंत लोकांना ऐकू आला. घटनास्थळी संतप्त नागरिकांनी ट्रॅक्टर चालकाला बेदम चोप दिला.

भांदेवाडा येथील जगन्नाथ महाराज देवस्थानात दरवर्षी राम नवमीला मोठा उत्सव असतो. यावेळी महाप्रसादाचेही आयोजन असते. या उत्सवाला पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्यने भाविक विविध वाहनांद्वारे आपली उपस्थिती लावतात. हाच कार्यक्रम आटोपून अडीच वाजताच्या दरम्यान वणी येथील काही स्त्रीया व पुरुष मंडळी ऑटोने वणी शहरात परतत होते. वणी शहरात प्रवेश केल्यानंतर साई मंदिर जवळ समोरून येणा-या एका भरदाव ट्रॅक्टरने या ऑटोला समोरासमोर जबर धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की त्याचा आवाज शेकडो मीटर अंतरावर लोकांना ऐकू आला.

आवाज ऐकू येताच लोकांनी मोठ्या संख्येने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी घटनास्थळी ऑटोचा समोरील भाग पूर्णतः क्षतीग्रस्त झाला. तर धडक देणारे ट्रॅक्टर काही अंतरावर जाऊन उलटले. या अपघातात ट्रॅक्टरची ऑईल टँक तुटल्याचे सकृत दर्शनी दिसत होते. विशेष म्हणजे ट्रॅक्टर चालक व त्याच्या सोबत असलेला सहकारी मद्यधंद अवस्थेत दिसून आला. यावेळी घटनास्थळी जमलेल्या लोकांनी सदस मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाला चांगलाच चोप दिला. काही समाजसेवी युवकांनी ट्रॅक्टर चालक व त्याच्या सहका-याला दुस-या एका ऑटोत बसवून त्यांना तात्काळ पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या हवाली केले.

तर दुसरीकडे ऑटोचालकासह पाच ते सहा प्रवासी जखमी झाल्याने त्यांनाही तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे ऑटोमध्ये असलेल्या प्रवाशांमध्ये महिलांची संख्या अधिक होती. बातमी प्रसारीत होत पर्यंत पोलीस घटनास्थळी पोहोचायचे होते. ट्रॅक्टर मालक व जखमींचे नाव अद्याप कळलेले नाही.

mirchi
Comments
Loading...