दुचाकी वाहन चोरट्यांना अटक

0 487

वणी/विवेक तोटेवार: वणी पोलिसात गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी वाहन चोरण्याबाबतच्या तक्रारी येत होत्या. परंतु पोलिसांना चोरटे गवसत नसल्याने चोरटे चांगलाच डाव साधत होते. शनिवारी सकाळी खबरीकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन चोरट्याना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी झाल्याच्या तक्रारी येत होत्या. पोलीस या चोरट्यांचा शोध घेत होते. परंतु चोरटे मात्र गवसत नव्हते. राम अर्जुनदास नानवाणी यांचे दुचाकी क्रमांक एम एच 29 ए जे 7942, चोरीला गेले होते. दुसरी तक्रार प्रमोद आवारी यांचे वाहन क्रमांक एम एच 29 ए एल 1171 नांदेपेरा रोडवरील हेडाऊ हॉस्पिटल समोरून चोरी गेले होते. तर तिसरी तक्रार रितेश राजू गौतम यांचे वाहन क्रमांक एम इह 29 एल 7509 चोरी गेल्याची तक्रार होती. शनिवारी दुपारी पोलीस ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना चोरट्यांबाबत माहिती मिळताच त्यांनी वेळ न दवडता डी बी पथकाला पाचारण केले. डी बी पथकाने त्वरित कार्यवाही करीत आरोपी अक्षय संजय तुराणकर राहणार जनता शाळेजवळ वणी. शंकर पतरुजी शेंडे (35) राहणार रंगनाथ नगर वणी व एका विधिसंघर्ष बालकास अटक  केले. त्यांच्यावर भादवी कलम 379 व 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांच्याकडून तीन दुचाकी वाहन ज्याची किंमत अंदाजे 95 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शनिवारी सायंकाळी तिन्ही आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात डी बी पथकाचे सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, सुधीर पांडे, दीपक वंडर्सवार, नितीन सलाम, आनंद अलचेवार, अमित पोयाम, सुदर्शन वानोळे यांनी केली.

NBSA
Comments
Loading...