विदर्भातील युवकांचा मध्य प्रदेशात सत्कार

रक्तदानाच्या माध्यमातून हजारों रुग्णांना मदत

0

सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिह्यातील मुकूटबन व इतर गावातील तरुण गेल्या चार वर्षांपासून ‘रक्तदान या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा या कार्याची मध्य प्रदेशातही दखल घेतली असून या तरुणांचा मध्यप्रदेशात सत्कार करण्यात आला.

रक्तविर बहुउद्देशीय संस्थाच्या या युवकांचा मध्य प्रदेशातील इंदोर येथे सत्कार करण्यात आला. दैनंदिन जिवनात सोशल मिडीयाचा वापर कित्येक युवक करतात. परंतु या युवकांनी गेली चार वर्षे या माध्यमातून हजारों रक्तदाते गोळा केले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण भारतात गरजु आणि गरीब रूग्णांना रक्तदाते व रक्त उपलब्ध करून दिले.

या सत्कार समारंभामध्ये संपुर्ण भारतातील रक्तदान क्षेञात कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात आला. यावेळी रक्तविर बहुउद्देशीय संस्थाचे मुकूटबन येथील गणेश मुद्दमवार, पांढरकवडा येथील प्रियल पथाडे, नागपुर येथील गोकुल जुमनाके, ब्रम्हपुरी येथील स्वप्नील अलगदेवे, यवतमाळ येथील प्रफुल भोयर या युवकांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभ मध्य प्रदेशातील सोच ब्लड गृप संस्था यांच्या तर्फे आयोजीत करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.