विठ्ठलवाडीत खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन

तीन दिवस रंगणार स्पर्धा, वणीकरांना मेजवानी

0
विलास ताजने, वणी: वणी येथील विठ्ठलवाडी परिसरात दि. १८ ते २० जानेवारी दरम्यान जगन्नाथ बाबा गुरुदेव सेवा भजन मंडळाच्या वतीने खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ जानेवारीला सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाचे उद्दघाटन नगर परिषदेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे  यांच्या हस्ते होणार आहे. 

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार तर प्रमुख पाहुणे म्हणून वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार बाळासाहेब खाडे, यवतमाळचे जिल्हा सेवाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे, डॉ. महेंद्र लोढा, सुनील कातकडे, संजय पिंपळशेंडे, दिनकर पावडे, प्रा. विजय वाघमारे, डॉ. गजानन अघळते, बाळा पळवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. उद्दघाटन समारंभ आटोपताच दुपारी नेत्र तपासणी शिबीर, रांगोळी स्पर्धा, सामुदायिक ध्यान, प्रार्थना होणार आहे. सायंकाळी सात वाजता ह.भ.प. जयश्री गावतुरे (मूल) यांचे कीर्तन होणार आहे. 

 

दि.१९ शनिवारी सकाळी साडेसहा ते रात्री दहा वाजेपर्यंत भजन स्पर्धा (ग्रामीण विभाग) तर दि.२० रविवारी सकाळी साडेसहा ते रात्री दहा वाजेपर्यंत भजन स्पर्धा (राज्यस्तरीय विभाग) होणार आहे. स्पर्धा संपताच भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. रवी मत्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग देठे, अमोल रांगणकर, श्रीकांत पोटदुखे, नितीन धाबेकर, पुरुषोत्तम बोबडे, रंजना झाडे, अखिल सातोरकर, भाऊराव येसेकर उपस्थित राहणार आहे. परिसरातील रसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक गुरुदेव सेवा मंडळ पुरुष, महिला आणि संस्कृती महिला भजन मंडळाने केले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.