मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण

झाडं जगवण्याची घेतली शपत

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षतोडीमुळे निसर्गाचा असमतोल व जमिनीतील पाण्याची पातळी घटणे आदी समस्या संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात उद्भवल्या आहे. त्यामुळे प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, शाळांना पुढाकार घेऊन झाडे लावण्याचे आदेश दिले आहे.

फक्त झाडे लावून सोडून देण्यापेक्षा झाडाला पाणी देऊन पालनपोषण करा, जेणेकरून ते वाढेल व मोठे होऊन जनतेला सावली व ऑक्सिजन देईल, असे प्रतिपादन ठाणेदार धर्मराज सोनुने यांनी केले. यावेळी झाडं जगवण्याची शपत उपस्थितांनी घेतली.

याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, सुशील ओझा, जमादार अशोक नैताम, रमेश ताजणे, नीरज पातूरकर, रमेश मस्के, राम गडदे व बंडू पारखी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.