HSC निकाल: प्रेरणा तातेड व भूषण ढुमणे वणीतून अव्वल

वणी पब्लिक स्कूल महाविद्यालय ठरले सर्वोत्कृष्ट

0
विवेक तोटेवार, वणी: आज मंगळवारी दुपारी 1 वाजता 12 वि निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात वणी पब्लिक स्कूल अव्वल ठरलीये. वणीतून सर्वाधिक विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील टॉपर व वणीतील सर्वाधिक निकाल याच कॉलेजचा आहे. या कॉलेजची वाणिज्य शाखेतील प्रेरणा विजेंद्र तातेड ही 89.23%  गुण मिळवून अव्वल ठरलीये. तर याच वाणिज्य शाखेतील मधुर प्रदीप लखमापुरे हा विद्यार्थी 88.92 % गुण गुण घेऊन दुस-या क्रमांकावर राहिला.

 

विज्ञान शाखेतून भूषण विनोद ढुमणे हा विद्यार्थी 86.92%  गुण घेऊन वणीत प्रथम आला आहे. त्यानंतर एसपीएम महाविद्यालयाची नंदिनी मुकुंद वडस्कर या विद्यार्थीनीने 85.23 % गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम व परिसरातून द्वितीय येण्याचा मान मिळवला. तर लोटी महाविद्यालयातील तन्मय दिलिप आस्कर या विद्यार्थ्यांने 83.85 % गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम व वणीतून तृतिय येण्याचा मान मिळवला. श्रीमती नुसाबाई चोपणे महाविद्यालयातून कु. सुकेशनी दिलिप वाळके ही विद्यार्थीनी 76.15 टक्के गुण घेऊन प्रथम आली आहे. तर लॉयन्स इंग्लिश मीडियम कॉलेजमधून कौस्तुभ कुंभलवार 68 टक्के गुण घेऊन प्रथम आला आहे.

 

एससीएम विद्यालयातील कला शाखेत हर्षद रामभाऊ पेंदोर हा 79.69 % मार्क्स घेऊन अव्वल ठरला आहे. लोटी महाविद्यालयातील अनिकेत मोहन खुसपुरे या विद्यार्थ्याने 77.69 टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून अव्वल ठरला आहे. वाणिज्य शाखेतील कु. जान्हवी रमेश दहिवलकर ही लोटी महाविद्यालयातील विद्यार्थीनी 83.85 % गुण घेऊन वाणिज्य शाखेतून परिसरातून प्रथम आली आहे. तर वीवोसी शाखेतून समीर पेंदोर 68.92 टक्के गुण घेऊन प्रथम आला आहे.

 

माथार्जून येथील राजीव ज्युनिअर कॉलेजचा 100 टक्के निकाल
वणी विभागातून झरी जामनी तालुक्यातील माथार्जून येथील राजीव ज्युनिअर कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला आहे. यात 37 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 37 विद्यार्थीही पास झाले आहे. त्याखाली मातोश्री पुन्काबाई कॉलेज मुकुटबन 95.89 टक्के व राजीव ज्युनिअर कॉलेज पाटणचा 94.33 टक्के निकाल लागला आहे. त्याखाली वणीतील पब्लिक स्कूल ज्यु कॉलेजचा निकाल 91.21 टक्के व आदर्श ज्यु कॉलेज शिंदोल्याचा 90.16 टक्के निकाल लागला आहे. तर वणी विभागात सर्वात कमी निकाल जगन्नाथ महाराज ज्यु कॉलेज, वणीचा लागला असून या कॉलेजचा फक्त 9 टक्के निकाल लागला आहे.
यावेळी गुणांची टक्केवारी घसरली 
दरवर्षी वणीतील टॉपर हा 90 टक्क्यांच्या आसपास किंवा त्यापेक्षा अधिक गुण घ्यायचा. मात्र यावर्षी परिसरातील निकालाचे प्रमाण वाढले असले तरी गुणांची टक्केवारी कमी झाली आहे. यावर्षी परीक्षेचा पॅटर्न बदलल्याने गुणांची टक्केवारी कमी झाल्याची माहिती प्रा. आनंद गोहोकार यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली. 
Leave A Reply

Your email address will not be published.