वणी–कोरपना रस्त्यावर भीषण अपघात… १० जण ठार, ४ गंभीर

0 7,719

विलास ताजने, वणी : वणी ते कोरपना रस्त्यावर दि.८ शनिवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान ट्रक आणि काळी-पिवळी या प्रवासी वाहनांची जोरदार धडक  होऊन भीषण अपघात झाला. यात काळी-पिवळीच्या चालकासह दहा जणांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी आहे. या भीषण अपघातातील मजूर प्रवासी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील होते. तर चालक हा वणी जवळील लालगुडा येथील आहे. 


चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील वणी ते कोरपना रस्त्यावरील हेटी (कोळसी) या गावाजवळ सदर अपघात शनिवारी रात्री झाला. वणी वरून गडचांदूर परिसरातील सिमेंट कंपनीत जात असलेल्या ट्रक क्रमांक एम एच 29 टी 1683 टायर फुटल्याने भरधाव काळी पिवळी क्रमांक एम एच 29 टी 8582 या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावर आदळला. महागाव (उमरखेड)येथील मजूर कामाच्या शोधार्थ कोरपना येथील कापूस जिनिंग मध्ये आले होते. मात्र काम न मिळाल्याने ते वणी मार्गे  गावाकडे परतीच्या प्रवासात निघाले होते. चालकासह एकूण पंधराजण गाडीत बसून होते. 


या भीषण अपघातातील मृतात सात महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. चार गंभीर जखमींना उपचारासाठी चंद्रपूर येथील दवाखान्यात दाखल केले. केवळ एक ते दीड वर्षाचे लहान बाळ या अपघातातुन सुखरूप वाचले. त्याला कोरपना येथील किशोर पाटील यांनी  वाहनातून बाहेर काढले. घटनास्थळावर रक्त-मासाचा पडलेला सडा मन विचलित करणारा होता. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी कोरपनाचे पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसरकर, गडचांदूरचे पोलीस निरीक्षक पवार दाखल झाले. 

mirchi
Comments
Loading...