पोळ्याच्या पार्श्वभूमीवर 35 हजारांचा दारूसाठा जप्त

वणीतून चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी करताना अटक

0

रवी ढुमणे, वणी: वणी पोलिसांनी दारू तस्करी करणा-या एका इसमाला अटक केली आहे. एका निळ्या रंगाच्या कारमधून ब्राह्मणी रोडवरून वरो-याकडे दारू नेली जात आहे याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ठाणेदारांनी सापळा रचून 35 हजारांचा दारूसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी दुर्वेश उर्फ सोनू भास्कर तिराणकर याला अटक करण्यात आली आहे.

वणी शहरातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू तस्करी सुरू आहे. विविध क्ल्रप्त्या वापरून दारू तस्कर हजारो लिटर दारू चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचवतात. अशाच प्रकारे चंद्रपुरात दारू तस्करी होणार असल्याची माहिती ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांना मिळताच त्यांनी सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सापळा रचला.

ब्राह्मणी रोडवर एमएच 00 C 38 या क्रमांकाची निळ्या रंगाची कार येतांना दिसताच ठाणेदार कुळकर्णी यांनी डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, अरूण नाकतोडे, उल्हास कुरकुटे, सधिर पांडे, सुनिल खंडागळे, दिलीप जाधव यांना सोबत घेवून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात निळ्या रंगाच्या कारची झडती घेण्यात आली.

(शिंदोलाजवळच्या हनुमाननगरात अवैध दारू विक्री)

कारमध्ये त्यांना देशी दारूच्या 90 मिलीच्या दिड हजार बाटल्या आढळल्या. हा माल सुमारे 35 हजार रुपये किमतीचा आहे. वाहनात दारू तस्करी करणारा दुर्वेश उर्फ सोनू भास्कर तिराणकर याला कारसह ताब्यात घेवून जवळपास एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.