वणी पोलिसांनी पकडली 18 लाखांची दारू

29 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपींना अटक

0

गिरीश कुबडे, वणी: वणी पोलिसांनी रविवारी संध्याकाळी
पांढरकवडा वरून करंजी, मारेगाव, वणी मार्गे चंद्रपूरला जाणारी अवैध दारू पकडली. यात देशी दारूच्या 700 पेट्या जप्त करण्यात आल्या. यात 70 हजार प्लास्टिक पव्वे आढळले. ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार ट्रक एम एच ४० एन ९६२१ या ट्रकमध्ये अवैधरित्या दारू चंद्रपूरला नेली जात असल्याची गोपनिय माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी केसुर्ली फाट्याजवळ सापळा रचला. नाकाबंदी करून सदर ट्रकची पाहणी केली असता यात देशी दारुच्या 700 पेट्या आढळून आल्या. त्याची किंमत 18 लाख 20 हजार रुपये इतकी आहे. ही दारू चंद्रपूरला घेऊन जात असल्याची माहिती ड्रायव्हरने दिली.

याप्रकणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करून ट्रक चालक राजेंद्र सुरेश खारकर (28) विजय नामदेव येरेकर (27) दोन्ही रा.वांजरी ता.वणी यांना अटक करण्यात आली आहे. 18 लाख 20 हजारांची दारू तसेच 11 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 29 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अशोक काकडे पोना.दिलीप अडकीने, महेंद्र भुते ,रवींद्र इसनकर, आशिष टेकाडे, संतोष कालवेलवार ,सादिक शेख ,नफिस शेख ,सुनील खंडागळे, सुधीर पांडे रत्नपाल मोहाडे, दीपक वाद्रसवार,अमित पोयाम, विजय वानखडे यांनी ही कार्यवाही केली.

(आपल्या जवळ असणा-या न्यूज किंवा पब्लिश झालेल्या न्यूज संबंधी संपर्क साधू शकता, निकेश जिलठे- संपादक, वणी बहुगुणी 9096133400)

Leave A Reply

Your email address will not be published.