वणीत 87 टक्के बाळांना पोलिओ डोज

0 221

वणी /विवेक तोटेवार: 11 मार्च रोजी संपूर्ण भारतात 5 वर्षांखालील बाळांना सरकारतर्फे निशुल्क पोलिओ डोज पाजण्यात आले. भावी पिढीत कुणालाही पोलिओ हा आजार होऊ नये यासाठी संपूर्ण भारतात हा कार्यक्रम पूर्णपणे निःशुल्क राबविण्यात येतो. त्या अनुषंगाने रविवारी वणीत 87 टक्के बाळांना पोलिओचा डोस पाजण्यात आला. यासाठी 35 ठिकाणी बूथ देण्यात आले होते. सकाळी 7 वाजतापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यत या सर्व बुथवर पोलिओ डोज पाजण्यात आला.

या पल्स पोलिओ मोहिमेसाठी वेगवेगळ्या बुथवर एकूण 87 कर्मचारी कार्यरत होते. बुथचे एकूण 6543 बालकांना इतक्या बालकांना पोलिओ डोज देण्याचे लक्ष्य होते. मात्र परंतु यातील 5535 बालकांना पोलिओ डोज पाजण्यात आला. उर्वरित बालकांना डोस देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय वणी द्वारे एक फिरते पथक कार्यरत राहणार आहे. मंगळवारपासून हे पथक वणीतील हनुमान मंदीर जत्रा मैदान, बसस्थानक, अनिस हॉल, दत्त मंदिर व रेल्वे स्टेशन याठिकाणी वंचीत बालकांना डोस पाजणार आहेत. अशी माहिती अधिपरिचरिक अरुणा गुरनुले यांनी वणी बहुगुणीशी बोलतांना दिली.

हा संपुर्ण कार्यक्रम वणी ग्रामीण रुग्णालयाच्या  वैद्यकीय अधिकारी डॉ माधुरी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. कुणीही आपल्या 5 व त्यापेक्षा कमी असलेल्या बाळाला पोलिओ डोस पासून वंचीत ठेऊ नये. तसेच ज्यांनी बाळांना पोलिओ डोस दिला नसेल त्यांनी आपल्या बाळाला पोलिओ डोज द्यावा असे आवाहन वणी डॉ. कांबळे यांनी केले आहे.

750 X 422 PODDAR
Comments
Loading...