पत्नीनं केला व्यसनाधीन पतीचा खून

भालर वसाहतीजवळील लाठी येथील घटना

0 619
वणी: वणी तालुक्यातील लाठी येथील महिलेनं पतीच्या गळा आवळून खून केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरोपी महिला ही पतीच्या व्यसनामुळे त्रस्त होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर घटना अशी की वेकोलीच्या भालर वसाहती पासून जवळच असलेल्या लाठी इथे साईबाबा खिरटकर हा राहतो. तो वेकोलीत कार्यरत होता. साईबाबाला दारू व इतर व्यसन जडले होते. व्यसन केल्यानंतर तो घरातील बायको मुलींना अश्लील शिवीगाळ करून मारहाण करीत होता. त्याच्या मुली पदविकेचं शिक्षण घेत आहे. साईबाबाच्या वारंवार होणाऱ्या त्रासानं घरातील मंडळी त्रासून गेली होती.

शुक्रवारी सायंकाळी पावणेसहा चे सुमारास साईबाबा दारू ढोसून घरी आला. त्याने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. प्रसंगी त्याच्या पत्नीचा राग अनावर झाला. वारंवार होणाऱ्या त्रासानं तीही वैतागली होती.अखेर तिनं कसलाही विचार न करता तिच्या जवळ असलेल्या ओढणीनं पती साईबाबाचा गळा आवळून खून केला.

यासंबंधीची माहिती पोलीस पाटील संजीवनी खिरटकर यांनी पोलिसांना फोन वरून देताच ठाणेदार सागर इंगोले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक योगेशकुमार दंदे, दादाराव चिल्लोरकर, प्रमोद जुनुनकर, योगेश ढाले, घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. यासबंधीची पोलीस पाटील संजीवनी खिरटकर यांनी  स्वतः पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावरून साईबाबाच्या पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेशकुमार दंदे, योगेश ढाले व पोलीस करीत आहे.

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...