शिरपूर येथे वीज पडून महिलेचा मृत्यू

0 12,040

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील शिरपूर येथे आज दि.८ शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान एका शेतात वीज पडली. यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर अन्य जण किरकोळ जखमी झाले. सुचिता महादेव गुरनुले वय ३० असे मृत महिलेचे नाव आहे. 

वणी तालुक्यात आज शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह अचानक पाऊस सुरू झाला. पंधरा ते वीस मिनिटे पाऊस पडला. यावेळी गुरनुले यांच्या शेतात तीन- चार महिला कापूस वेचत होत्या. यावेळी प्रचंड कडकडाटसह वीज पडली. शेतात उपस्थित सर्वांना विजेचा झटका बसला. सर्वांना भोवळ आली. मात्र सुकृता पडून होती. 


जखमी महिलेला तिच्या पतीने बैल गाडीत  टाकून मुख्य रस्त्यावर आणले. त्यानंतर रस्त्याने येणाऱ्या ऑटोरिक्षात टाकून शिरपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. पुढील उपचारासाठी वणीला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाला. तिच्या मागे पती, एक मुलगी, सासू, सासरे असा परिवार आहे.

mirchi
Comments
Loading...