योगेश पोद्दार यांची यावर्षीही जागतिक संमेलनासाठी निवड

योगेश पोद्दार यांचे MDRT विजय अभियान सुरूच

0

बहुगुणी डेस्क, वणी: एकमात्र सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या वणी शाखेतील योगेश रा. पोद्दार यांनी MDRT हा बहुमान यावर्षीही मिळवला आहे. लवकरच ते अमेरिका येथे संमेलनासाठी जाणार आहे. योगेश हे गेल्या वर्षी LIC च्या पश्चिम प्रदेशामध्ये (महाराष्ट्र, गोवा, गुजरात) 3 स्टार एजेंट म्हणून वणी शाखेच्या इतिहासातील एकमात्र व अमरावती मंडळातील फक्त दोन एजेंट पैकी एक होते.

MDRT (मिलियन डॉलर राउंड टेबल) म्हणजे आवश्यक व्यवसाय करून जगभरातील विमा एजेंट्सच्या सेमिनारला पात्र ठरणे होय. या सेमिनारला जगभरातील सर्व देशातील पात्र एजेंट्स येतात. जगातील विविध देशातील मोठ्या शहरात हे सेमिनार होतात. या वर्षी पात्र झालेल्या एजेंट्सचे सेमिनार अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील मियामी शहरात 9 जून ते 12 जून 2019 ला आहे.

योगेश पोद्दार यांनी MDRT चा बहुमान गेल्या वर्षीपेक्षाही कमी कालावधीत मिळविला आहे. या वर्षीसुद्धा ते वणी शाखेमधील सर्वप्रथम MDRT आहेत. विमा क्षेत्रातील आवश्यक ते सर्व ज्ञान आणि अनुभव यामुळे ते ग्राहकांमध्ये प्रिय आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी असणाऱ्या त्यांच्या स्वतःचे ऑफीस (पोद्दार इंशुरन्स सर्वीसेस) चे उदघाटन लवकरच होणार आहे.

या बहुमानाबद्दल ‘वणी बहुगुणी’शी बोलताना योगेश पोद्दार म्हणाले की…

विमा पॉलिसी ही प्रत्येकाची गरज आहे. मात्र ग्राहकांना अनेकदा चुकीची पॉलिसी दिली जाते. यात मग पॉलिसीची हफ्ते भरण्यात अनेकदा अडचणी येतात. ग्राहकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार योग्य ती पॉलिसी देण्यात माझा भर असतो. त्यामुळे ग्राहक तर वाढतात शिवाय ती पॉलिसीही सुरू असते. त्यासोबतच वेळोवेळी नवीन पॉलिसीची माहिती देणे, ग्राहकांचा विमा पॉलिसीचे हफ्ते भरण्यात वेळोवेळी मार्गदर्शन करून त्याचा पाठपुरावा करणे. या गोष्टींमुळे हे यश मिळवता आलं.

त्यांच्या या कार्यात त्यांचे विकास अधिकारी हेमंतकुमार आ. टिपले यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच वणी शाखेचे शाखाधिकारी रवींद्र कमाने, शाखाधिकारी (विक्रय) मोरेश्वर राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत राहिले. गेल्या वर्षी ते अमेरिका येथील लॉस एन्जिल्स मध्ये संमेलनात सहभागी झाले होते. यावर्षी त्यांना पुन्हा संमेलनात परदेशात जाण्याची संधी आल्याने त्यांच्यावर परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. या सर्वांच श्रेय ते कुटुंबिय आणि एलआयसीच्या अधिका-यांना देतात.

Leave A Reply

Your email address will not be published.