झरी तालुक्यातील शेतकरी त्रस्त, अधिकारी सुस्त

पिकांचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी

0

रफिक कनोजे, मुकूटबन: झरी तालुक्यात सध्या सर्वच गावात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिसरातील शेतकरी हवालदिल झाले असून कापसाच्या झाडांना चिमट्याने किवा ट्रॅक्टरने उपटून फेकत आहे. कापसाला भाव नाही, नाफेड द्वारा सोयाबीन काळे व बारीक आहे म्हणून घेण्यास टाळाटाळ सुरू आहे. त्यातच मागील १५ दिवसांपासून झरी तालुक्यात वाघांचा वावर दिसून आल्याने शेतक-यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.

ह्यावर्षी कमी पावसाचे प्रमाण होउन त्यावर मात करुन कापूस, सोयाबिन, तुरीचे पिकाचे संगोपन केलें. पण “दैव देते पन कर्म नेते” ह्या म्हणी प्रमाणे फवारणीच्या कीटक नाशकामुळे विषबाधा होउ लागली. त्यामुळे तालुक्यातील तीन लोक मृत्युमुखी पडली. झरी तालुक्यातील विषबाधे मुळे जे तीन लोक मरण पावले त्याला कृषी खाते जबाबदार नाही का?. बोंड अळीला सुद्धा कृषी खाते जवाबदार नाही का?

कृषी खात्याने आजपर्यंत सुध्दा बोंडअळीच्या प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशके उपलब्ध करून दिले नाही. तीन लोकांच्या मृत्युपुर्वी मागील चार महिन्यात शेतकर्यांना फवारणी कीट दिल्या का, शेतकऱ्यांच्या मालांची पाहणी किंवा शेतकर्यांना फवारणी कशी करावी हे सुद्धा मार्गदर्शन कृषिखात्यांनी केले नाही. ह्या विभागाद्वारे फक्त कागदी घोडे नाचवून ‘ऑल इज वेल’ दाखविण्यात येत आहे. विषबाधा झाल्यानंतर मार्गदर्शन पीक पाहनी करुन कृषीखाते उंटावरून शेळ्या हाकलतात असे निदर्शनास येते.

दसर्यानंतर परतीच्या पावसाने सोयाबिन व कापूस पिकाना झोडपून काढले. शेतमाल ओला झाल्याचे सोंग करुन शासनाने खरेदी केंद्रे सुरु केली नाही. ह्याचा फायदा खाजगी व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावाने खेडा खरेदी करुन शेतकर्यांची लूट केली. आता शासनाने खरेदी केंद्रे सुरु केलीत पन कापसाला भाव नसल्यामुळे शेतकर्यानि सीसीआय च्या कापूस खरेदीला पाठ दाखवली. नाफेडतर्फे आठ टक्के ओलावा असताना सुद्धा सोयाबीन काळे व बारीक आहे असे म्हणून खरेदी करण्यास टाळाटाळ करीत आहें.

आता मागील पंधरा दिवसापासून वाघामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. ह्या वाघामुळे शेतमजुरांनी शेतात जाणे बंद केले आहे. तर शेतकऱ्यांनी रात्रीला जागणीला जाणे बंद केले आहे. त्यामुळे जंगली जनावरे पिक उद्ध्वस्त करीत आहे. मागील ३ ते ४ वर्षांपासून ह्या वाघांनी अनेक जनावरे फस्त केली असून तीन माणसाचा बळी घेतला आहे.

वनाधिकारी सांगतात की एकट्याने जंगलात किवा शेतात वावरू नये. शेतात जागली करतानाही ४ ते ५ मजूर लावायेचे का? नुकतेच मुकुटबन शिवारात नंदू मन्दुलवार यांचे शेतात कापूस वेचून संध्याकाळी पावणे सहाला नंदू व ५ बायांनी पाच फुटावरून वाघ पहिला. ह्या सर्व गोष्टीवरून असे निदर्शनास येते की सरकार आणि संबधीत अधिकारी उंटावरून शेळ्या हाकत आहे.

त्यामुळे शेतकरी हवालदील होऊन आर्थिक संकटात आहे. कापसाला सात हजार रुपये प्रत्ती क्विंटल व सोयाबीन ला पाच हजार रुपये प्रत्ति क्विंटल भाव देण्यात यावा. शेतकर्यांना शासनातर्फे कीटकनाशकांची उपलब्धता करून द्यावी व पिकांचे सर्वेक्षण करुन आर्थिक मदत व शेतमालाला भाव देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.