झरी येथील लोक अदालतीत ३२ प्रकरणांचा निपटारा

0

सुशील ओझा, झरी: तालुका विधी समितीतर्फे आयोजित लोक अदालतीमध्ये ३२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यात ६ लाख ९४ हजार ५४० रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा झाली आहे. स्थानिक न्यायालयात ८ डिसेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयात मुकुटबन व पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या प्रलंबित असलेल्या केसेस पैकी एकाच दिवसात ३२ प्रकरणे निकाली काढण्यात आले.

लोक अदालतीच्या माध्यमातून ९ वादपूर्वक प्रकरणातून ४ लाख ५१ हजार ३०० रुपये , ४ चेक बाऊन्स प्रकरणातून २ लाख १८ हजार ८४० रुपये, १८ मोटार वाहन प्रकरणातून १४ हजार ४०० रुपये, वीज वितरण कंपनी च्या एका प्रकरणातून १० हजार रुपयांची तडजोड रक्कम जमा करण्यात आली.

यावेळी बोलताना न्यायाधीश के. जी. मेंढे म्हणाले की

लोक अदालतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त पक्षकारांनी आपले वाद सामोपचाराने मिटवावेत. प्रकरणे प्रलंबित राहिल्याने पक्षकारांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे लोक अदालतीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाल्यास त्याचा पक्षकारांचा त्रास कमी होतो.

यावेळी न्यायाधीश के. जी. मेंढे, सरकारी वकील पवनसिंग कपूर,  वकील दिपक काटकर, नितीन तिर्थगिरीकर, मदीकुंटावार, भोयर, अटरणी प्रकाश बेरेवार, राहुल बोथले, मुकूटबनचे ठाणेदार धंनजय जगदाडे, पाटणचे पोलीस ,न्यायालयीन कर्मचारी संजय बलकी, विष्णू तुळसीवार, कमलेश धोत्रे, महादेव भेदोडकार, राजदीप पांडे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.