विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू

शेतात बकरीसाठी चारा आणण्यासाठी गेल्यावर घडली दुर्दैवी घटना

0 450
सुशील ओझा, झरी: शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील आमलोन शेत शिवारात घडली. किसन महादेव मालेकर रा. तेजापूर असे मृतकाचे नाव आहे. मृतक आमलोन शेत शिवारातील किसन रघू मेश्राम यांच्या शेतात बकरीसाठी चारा आणण्याकरिता बुधवारी सकाळी ९ वाजता गेला होता. १० वाजताच्या सुमारास किसनचा चुलत भाऊ किसन लक्ष्मण मालेकर याला एका व्यक्तीचा फोन आला. तुझा चुलत भाऊ किसनला विजेचा धक्का लागून झाडाखाली पडला असल्याची माहिती दिली.
घटनास्थळी गेल्यानंतर किसन मृतावस्थेत आढळून आला. झाडाच्या फांद्या तोडताना कुऱ्हाडीचा जिवंत वीज ताराला स्पर्श झाल्याने किसनचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती पोलीस पाटील विचू यांनी पोलीस स्टेशनला दिली. ठाणेदार धर्मराज सोनुने यांच्या आदेशावरून जमादार मारोती टोंगे व जितू पानघाटे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतकाच्या मागे पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहे.
mirchi
Comments
Loading...