बेलदार समाजाची कार्यकारिणी गठीत

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सतपल्ली येथे बेलदार समाज कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यात राकेश मदिकुंटावार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. युवा विदर्भ बेलदार समाज संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष हनमंतू रजनलवार यांच्या अध्यक्षतेखाली सतपल्ली येथे सभा घेण्यात आली होती.

कार्यकारिणीत सतपल्ली बेलदार समाज संघटनेचे अध्यक्षपदी राकेश मदिकुंटावार, उपाध्यक्ष पदी श्रीनिवास लक्षट्टिवार, केशव आरेवार, सुनील सिंदमवार, सचिवपदी राज लक्षट्टिवार, सहसचिव सचीन सिंदमवार, कोषाध्यक्ष गजानन भंडारवार, सहकोषाध्यक्ष नरेश मुनगेलवार, संघटक गजानन लक्षट्टिवार, सरचिटणीस नरेश रजनलवार, प्रसिद्धी प्रमुख गजानन चंदावार, सहप्रसिद्धी प्रमुख गजानन गुंडावार, सदस्य लक्ष्मण लक्षट्टिवार, महेश  चूक्कलवार, जयपाल मेंगावार, वैभव चंदावार, शंकर मुनगेलवार, विकास दोतूंलवार, श्रीकांत बोल्लीवार, मंगेश मुंडलवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या सभेस माजी जिल्हाध्यक्ष किशोर देशट्टिवार, विक्कि देशट्टिवार, पार्लावार, देविदास चंदावार, राजन्ना लक्षट्टिवार, प.स.सदस्य राजू गोंड्रावार, श्रीनिवास मेंगावार, रमेश तांड्रावार, संजय चंदावार, हनमंतू बोल्लीवार, प्रतीक आईटवार, किष्टू चूक्कलवार, नंदू बनपेल्लिवार आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.