विदर्भा नदीने धारण केले रौद्ररूप, अनेक गावांना पुराचा वेढा

पुराचा हाहाकार, झरी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

0

सुशील ओझा, झरी: गेल्या 3-4 दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरले आहेत. तर तालुक्यातून वाहणा-या विदर्भा नदीने रौद्र रूप धारण केल्याने नदीकाढच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. पुराचे पाणी गावात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

तालुक्यातील अडेगाव येथील २० ते २५ घरात पावसाचे पाणी शिरले आहे. ग्रामवासियाना मोठी अडचण निर्माण झाली. तर विदर्भ नदीला पूर आल्याने पुरड नेरड या दोन्ही गावाला पाण्याने वेढले. नेरडमध्ये मुकुटबनच्या दिशेने असणारा लिलया पुलावरून तीन ते चार फुट पाणी वाहू लागले. तर दुस-या दिशेने विदर्भाला पूर आला. त्यामुळे या गावाचा संपर्क तुटला. तर मुसळधार पावसामुळे गावातील दोन्ही शाळा बंद होत्या. पुराचा फटका पुरड गावाला ही बसला इथली परिस्थितीही नेरह सारखीच होती. त्यामुळे परिसरातील नागरिक दहशतीत आले होतेे.

नेरड गावाला पुराचा वेढा

तेजापूर येथील पूल गेला वाहून
काही दिवसांपूर्वीच डॉ. लोढा यांच्या सहकार्यातून आणि तेजापूर वासियांनी श्रमदानातून ‘श्रमसेतू’ हा पूल बांधला होता. मात्र विदर्भा नदीला आलेल्या पुरामध्ये हा पूल वाहून गेला आहे. विदर्भा नदी ही नेरड-पुरड या गावांपासून प्रवास करीत पुढे तेजापूरला येते. मात्र पात्रातील पाणी वाढल्याने तेजापूरच्या अलिकडे नदीने प्रवाह बदलवला. त्यामुळे नदीचे पाणी श्रमसेतू असलेल्या नाल्याच्या पात्रात शिरले. हा प्रवाह इतका भयंकर होता की यात पूल तर वाहून गेला शिवाय हे पाणी परिसरातील शेतात देखील शिरले. त्यामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा पूल श्रमदानातून बांधण्यात आला होता.

वाहून गेलेला हाच तो ‘श्रमसेतू’ पूल

तेजापूरचे रहिवाशी सचिन टोंगे वणी बहुगुणीशी बोलताना म्हणाले की….

पूल बांधण्यासाठी आम्ही दिवसरात्र एक केला. मात्र नदीला पूर आल्याने हा वाहून गेला. याचं आम्हाला वाईट वाटतंय.
जरी हा पूल  खचला असला तरी आम्ही मात्र खचलेलो नाही. काही दिवसांमध्ये आम्ही पुन्हा हा पूल श्रमदानाने बांधून उभा करू अशी आशा तेजापूरचे रहिवाशी सचिन टोंगे यांनी ‘वणी बहुगुणी’जवळ व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.