यवतमाळ ते उमरेड व्हाया वणी, चंद्रपूर… दारू तस्करीचा नवा फंडा

उमरेडला जाणारी दारू चंद्रपूर जिल्हा बार्डरवर जप्त

0

जितेंद्र कोठारी, वणी: दारू तस्करीसाठी विविध क्ल्रुप्ती वापरल्या जातात. ऍम्बुलन्स, दुधाची गाडी, आईलचे टॅन्कर अशा विविध आयडीया वापरल्यानंतर आता एक नवीनच क्ल्रुप्ती उघड झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात जाण्यासाठी चक्क व्हाया चंद्रपूर असा पास काढून दारू तस्करी केली जात आहे असा संशय पोलिसांना आहे. हा नवीन फंडा बेलोरा चेक पॉइन्टजवळ उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी दारूसाठा जप्त केला असून सध्या चौकशी सुरू आहे.

दिनांक 4 मे ला दुपारी 12 वाजता यवतमाळहून एक बोलेरो पिकअप मालवाहू वाहन (MH40 BG 8749) नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे जाण्यासाठी निघाले. सायंकाळी 4 वाजता दरम्यान यवतमाळ-चंद्रपूर जिल्ह्यातील सीमेवर बेलोरा चेकपोस्टवर शिरपूर पोलिसांनी अडवुन तपासणी केली. त्यात रॉकेट ब्रँड संत्रा देशी दारूच्या 250 पेट्या भरलेल्या आढळल्या. बोलेरो चालकाला विचारपूस केली असता देशी दारूच्या पेट्या यवतमाळ येथील राजू वाईन एजन्सी येथून नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात जात असल्याचे सांगितले.

संग्रहित चित्र

पोलिसांनी चालकाजवळ असलेला वाहतूक परवाना बघितले असता त्यावर यवतमाळ, वणी, बेलोरा फाटा, निळजई, चंद्रपूर ते उमरेड असा मार्गक्रमण नमूद करण्यात आलेले होते. यवतमाळ ते उमरेडला जाण्याचा हा नवीन आणि अफलातून मार्ग पाहून पोलिसही चक्रावले. यवतमाळ येथून कळंब, देवळी, वर्धा, बुटीबोरी ते उमरेड हा 161 की.मी. चा हायवे रोड असताना वाहतूक पासवर यवतमाळ, वणी, निलजई, बेलोरा फाटा, चंद्रपूर ते उमरेड असा 292 की.मी. मार्गक्रमण नमूद करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी सदर वाहनातील दारू प्रतिबंधीत चंद्रपूर जिल्ह्यात विक्रीसाठी जात असल्याचा संशयावरून वाहन व दारू पेट्या जप्त केल्या.

चौकशीनंतर पुढील कार्यावाही करणार – राऊत
ताब्यात घेण्यात आलेले वाहन व वाहतूक परवान्याबाबत राज्य उत्पाद शुल्क विभागाला सूचना देण्यात आली आहे. यवतमाळ ते उमरेड जाण्यासाठी या मार्गाचा वाहतूक परवाना कोणत्या आधारे निर्गमित करण्यात आला, याचाही खुलासा मागविण्यात आला आहे. सद्य दारू पेट्या व वाहन शिरपूर पोलीसांच्या ताब्यात असून चौकशीनंतर पुढील कारवाई करणार.
– अनिल राऊत, सहा. पोलीस निरीक्षक, पो. स्टे. शिरपूर

दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मद्यपींचे चोचले पुरविण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातून वणी बेलोरा घुग्गुस मार्गे मोठ्या प्रमाणात दारू तस्करी सुरू आहे. दारू तस्करी साठी तस्करांकडून वेगवेगळे फंडे वापरले जाते. मात्र परवान्यावर मार्ग बदलून दारू तस्करीचा हा अफलातून फंडा बघून पोलीसही चक्रावले आहे. हा मार्ग दारू  तस्करीसाठीच तर पत्करला नव्हता हे चौकशीनंतर स्पष

Leave A Reply

Your email address will not be published.