कविता ते संपादकत्व… पांडेजींचा ‘दबंग’ प्रवास !

साहित्यिक हा पत्रकार असो की नसो; पण पत्रकार हा मात्र साहित्यिक असतोच असं माझं मत आहे. पत्रकार हा सृजनशील असतोच, किंबहुना तो असावाच लागतो. साहित्यिक अंगाने केलेली पत्रकारिता ही अधिक परिणामकारक असते. साहित्य हे जीवनाचं प्रतिबिंबच असतं. त्यात कल्पनारम्यता, रंजकता, अतिरंजकता स्वाभाविकपणे येते. पत्रकारिता ही साहित्यिक अंगाने केली तरी ती काटेकोर असावी. वास्तवाचं भान ठेऊन मोजकं व नेटकं मांडणं हे पत्रकारितेतच अपेक्षित असतं.